breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: वाकडची 62 वर्षीय हिरकणी सुनबाईसह कोरोनाविरुद्ध लढतेय!

– परिचारिका म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ४ वर्षांनी पुन्हा सेवेत

– सासू-सुनबाईचा महाराष्ट्रातील कोरोना योद्धांसमोर प्रेरणादायी आदर्श

#waragainstcorona: वाकडची 62 वर्षीय हिरकणी सुनबाईसह कोरोनाविरुद्ध लढतेय!

– परिचारिका म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर ४ वर्षांनी पुन्हा सेवेत

– सासू-सुनबाईचा महाराष्ट्रातील कोरोना योद्धांसमोर प्रेरणादायी आदर्श

पिंपरी । महाईन्यूज  । प्रतिनिधी

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे…रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे…आरोग्य यंत्रणेत काम करणारे कोरोना योद्धे या लढाईमध्ये जीवाची बाजी लावून काम करीत आहेत….या युद्धात रोज वाढणारी रुग्ण संख्या आणि दिवसेंदिवस घायाळ होणारे आपले ‘सैन्य’…यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिचारिका किंवा आरोग्य सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हितासाठी- आपल्या लोकांसाठी पुन्हा सेवेत रुजू व्हावे…असे आवाहन केले…या आवाहन प्रतिसाद देत…वाकड येथील ६२ वर्षीय ‘हिरकणी’कोरोनाविरुद्धचा ‘कडा’चढण्यासाठी मैदानात उतरली आहे…

होय….वृद्ध नागरिक आणि बालकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे…पण वयाच्या ६२ व्या वर्षीही ‘रिस्क’घेत लोकसेवेसाठी वाकडमधील सौ. रेखा गिरमे सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या सुनबाईही परिचारिका म्हणून वायसीएम रुग्णालयात कर्तव्य बजावत आहेत. एकाच कुटुंबातील सासू आणि सून कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावत असलेली ही राज्यातील एकमेव घटना म्हणावी लागले.

वाकड गावातील एकाच घरातील सासू व सून या दोन हिरकणी कारोनाच्या लढाईत आरोग्य सेवेचे व्रत हाती घेऊन करोना रूग्णांची सेवा करत आहेत . संपूर्ण जगभरात करोनाचा कहर सुरू असताना 4 वर्षे सेवानिवृत्त झाल्यावर देखील वयाच्या 62 व्या वर्षी  प्रशासनातून एकच फोन येतो आणि जीवाची पर्वा न करता सासू  सौ. रेखा ज्ञानेश्वर गिरमे

करोना सेवेसाठी कोविड -19 बालेवाडी सेंटर मध्ये रुजू होतात. तर दुसरीकडे  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात इमेर्जेंसी सेवेत कार्यरत असणाऱ्या त्याच घरातील सूनबाई सौ. प्रियका संदिप गिरमे करोनाच्या लढ्यात उडी घेतात. 2 लहान मुलांना आजोबा व पती यांच्याकडे सांभाळायाला  ठेऊन त्या करोना लढाईत महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.

       संपूर्ण जगभरात करोनाचा कहर सुरू असताना प्रशासन, डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी  यासह सर्व अत्यावशक सेवेतील कर्मचारी हे जीवाची बाजी लावून अहोरात्र कशाचीही पर्वा न करता देश सेवा करत आहेत.

तसेच सेवा बजावत असताना P P किट अंगावर चढविने व उतरविणे याला एक सिस्टीम आहे या प्रकियेला साधारण 15 ते 20 मिनट लागतात त्यामुळे एकदा हे किट घातले की 6 ते 7 तास दिवसा व रात्रपाळी त 8 ते 10 तास काढता येत नाही. यादरम्यान च्या काळात त्यांना पाणी पिणे किंवा नैसर्गिक विधीला सुद्धा जाता येत नाही. सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतही करोनाशी दोन हात करणाऱ्या या योद्धांचे जे काय हाल होत असतील यांची कल्पना न केलेलीच बरी. विशेष म्हणजे, या एकाच घरातील या दोन हिरकणी करोनग्रसत्तांना जीवदान देण्यासाठी आरोरात्र झटत आहेत. ही बाब पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानास्पद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button