breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबई-पुणे येथे कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता

पुणे – कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती.

यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील  बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशे पर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

अमित देशमुख पुढे म्हणाले की, मुंबईतील भायखळा येथील जे.जे. महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे  चाचणी केंद्र उभारण्यात आले असून यालाही आजच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा चाचणीसाठी केवळ एकच  केंद्र उपलब्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button