breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

धक्कादायक! शिक्षिकेनेच केला 15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत सेक्स, गर्भवती झाल्याचा दावा

मुंबई: एका विवाहित शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यासोबत शरीसंबंध ठेवले आहेत. परिणामी शिक्षिका गर्भवती राहिलेली आहे. शरीसंबंधांनतर गर्भवती राहणे ही अगदीच सर्वसामान्य प्रक्रिया असली तरी हे प्रकरण तितके सर्वसामान्य नाही. ही विवाहित शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स करुन तेवढ्यावरच थांबलेली नाहीय. तर तिने या संबंधावेळी टिपलेली खासगी आणि नग्नावस्थेतील छायाचित्रे त्या विद्यार्थ्याला पाठवली होती. यात आणखी धक्कादाक असे की, हा विद्यार्थी अल्पवयीन म्हणजे अवघा 15 वर्षांचा आहे. या प्रकरणावरुन सध्या जनमानसातील वातावरण भलतेच तापलेले आहे. हा प्रकार नेमका कुठे आणि कसा घडला? घ्या जाणून. इंग्लंडमधील Buckinghamshire School मध्ये अध्यापन करणाऱ्या विवाहीत 35 वर्षीय शिक्षिका कैंडिस बार्बर हिच्यावर आरोप आहे की, तिने विद्यार्थी असलेल्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवल्यामळे ती गर्भवती राहिलेली आहे. तसेच, कॅंडिस बार्बर हिने कामुक कृती करत सेक्स टॉईज सोबत उत्तान अशी छायाचित्र कथीत स्वरुपात विद्यार्थ्याला पाठवलेली होती. ही छायाचित्रे पाठवून पुढे तिने विद्यार्थ्याला सांगितले की तू अगदीच तंदुरुस्त आणि उत्साही आहेस. शिक्षिकेवर असाही आरोप करण्यात आला आहे की, ही शिक्षिका स्वत:ची मुलं शाळेत जाण्याच्या वयात असताना तिने अशा प्रकारची कृती केलेली आहे.

तिने या मुलाला सप्टेंबर 2018 पासूनच अशा प्रकारचे संदेश पाठविणे सुरु केलेले होते. हा खटला आयलेसबरी क्राउन कोर्टासमोर सुरु आहे. कोर्टात सांगण्यात आलेले की, या शिक्षिकेने या मुलाचा फोन मागून घेतला आणि त्यात आपले स्नॅपचॅट अकाऊंटचे तपशील भरले होते. पुढे या शिक्षिकेने या मुलाला संदेश पाठविण्यास वारंवार सुरुवात केली. एकदा तर तिने हद्दच केली. तिने मुलाला संदेश पाठवला की ती अंघोळ करत आहे आणि अशा अवसस्थेत तो तिला पाहू इच्छितो काय? त्यानंतर शिक्षिका कैंडिस बार्बर हिने त्या मुलाला स्वत:च्या वाहनातून शेतात नेले आणि तिथे एकांतात त्याच्यासोबत सेक्स केले होते. विद्यार्थ्यासोबत सेक्स करण्यापूर्वी या शिक्षिकेने त्याला आपली नग्न छायाचित्रे पाठवली होतीच. सेक्स करण्यासाठी हे दोघे फक्त दोनच वेळा भटले आहेत. कारण तोपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत या दोघांची एकांतातील (सेक्स करतावेळची) छायाचित्रे पहोचली होतीच. न्यायालयात सांगण्यात आले की, 2018 मध्ये मुख्याध्यापकांनी ही छायाचित्रे पाहिली होती. शिक्षिका कैंडिस बार्बर हिला गेल्या वर्षी पोलिसांनी अटक केलेले होते.दरम्यान, आपल्या शिक्षिकेसोबत अशा प्रकारचे लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपाचे विद्यार्थ्याने खंडण केले होते. मात्र, पुढे याच विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, मी पहिल्यांदा खोटे बोललो होतो.

कारण, शिक्षिकेने त्याला सांगतले होते की, ती त्याच्या बाळाची आई बणणार आहे. त्यामुळे आपण अशा कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवल्याचे आरोप फेटाळले होते. तसेच, शिक्षिकेने सांगितले होते की, जर आपल्या संबंधांबाबत कुठे वाच्यता करशील तर मी तुझे जगणे मुश्लिल करेन. मी शिक्षिकेला असेही म्हटले की, तू माझ्यावर बलात्काराचा आरोप करणार आहेस काय? तर तिने थेट काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे मलाही प्रचंड राग आला होता. शेवटी विद्यार्थ्यानेही या लैंगिक संबंधांबाब कबुली दिली आहे. प्रॉसिक्यूटर रिचर्ड मिल्ने यांनी न्यायालयात सांगितले की शिक्षिका कैंडिस बार्बर ही जेव्हा विद्यार्थ्याला भेटली तेव्हा तिला बरेच विचित्र वाटलेले होते. कारण हा मुलगा तिच्या मुलाचाही मित्र होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button