breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णालयातून घरी पाठवलेल्या रुग्णाला कोरोना

मुंबई – कोरोनाची लक्षणे आढळल्यानं कस्तूरबा रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीस रुग्णलयातील डॉक्टरांनी औषधं देऊन परत पाठवलं. मात्र काही दिवसांत तब्येत खालावल्यानं संबधित व्यक्तीची खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात आली ही चाचणी  पॉझिटिव्ह निघाल्यानं खळबळ उडाली आहे.

सध्या राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळले आहेत ते  परदेशातून प्रवास करुन आले आहेत किंवा ज्यांना कोरोना झाला आहे अशाच व्यक्तींच्या  संपर्कात आले आहेत.  त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांच्या प्राधान्यानं कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.  

संबधीत कोरोना बाधीत रुग्ण  काही दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता.  त्याला ताप, थंडी, सर्दी ही कोरोनाची  प्रमुख लक्षणे आढळली होती. मात्र तो परदेशातून प्रवास करुन आला नव्हता किंवा  त्याच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या रोगाची लागण झाली नव्हती, त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयातून काही औषधं देऊन त्याला परत पाठवण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button