breaking-newsपुणेमुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग उद्या एक तासासाठी बंद

मुंबईकडून पुण्याकडे जाणारा द्रुतगती मार्ग गुरूवारी एक तासासाठी बंद राहणार आहे. द्रुतगती मार्गावर सूचना फलक लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या दुपारी १२ ते एक या दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद राहणार आहे.
उद्या दुपारी १२ ते १ या दरम्यान ४० मिनीटांसाठी सूचना फलक लावण्यासाठी मुंबईकडून पुण्याकडे जाणारा द्रुतगती मार्गिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान सर्व वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे. अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.

गणेशोत्सवानंतर पुणे-मुंबई मार्गावर असाच ब्लॉक घेऊन, सूचना फलक बसवले जातील. द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात अथवा कोठेही वाहतूक कोंडी झाल्यास, पर्यायी मार्गजवळच प्रवाशांना तशा सूचनांसह अनेक फलक लागणार आहेत. अशीही माहिती एमएसआरडीसीने दिली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button