breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्ल्यूचे एकाच दिवशी दोन बळी, मृतांचा आकडा १३ वर पोहोचला

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ६० वर्षीय पुरुष आणि ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. दोघांवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यासोबतच स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १३ वर पोहचला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे गेल्या तीन दिवसात चार जणांचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे.

जानेवारीपासून शहरात ७९ रुग्ण आढळले असून यापैकी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे १० जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील माण येथील ७२ वर्षीय वृद्ध महिला आणि मलकापूर बुलढाणा येथील ६० वर्षीय पुरुषावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्ध महिलेवर २ सप्टेंबर तर ६० वर्षीय पुरुषावर ३१ ऑगस्टपासून उपचार सुरू होते. दोघांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीला शहरात एकूण २५ जण बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यू विषयी धास्ती वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button