breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई पालिकेतील २५८८ कर्मचारी कोरोनाबाधित

  • १३२ कर्मचाऱ्यांचा मृृत्यू

मुंबई – मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील तब्बल २,५८८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून आतापर्यंत १३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात अधिक म्हणजे १०७ इतकी आहे.

सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाशी संबंधित काम देण्यात आले होते. धारावीमध्ये अन्न वाटप करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. सहा महिन्यांत पालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत केवळ सहा मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ५० लाखांची नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली. योजनेतील निकषांमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळू शकली नाही, असे त्यांनी सांगितले. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे म्हणणे समजू शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button