breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

पुणे – आजपासून राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

उद्याही राज्यात पाऊस

3 डिसेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या रात्री पासुन मुसळधार पाऊस चालु आहे आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबली आहे. सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना तुरळक प्रमाणात घडल्या आहे. त्यामुळे गरज पडल्यास मदतीसाठी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व सेवा केंद्रला संपर्क साधावा असे अहवान पालिके कडून करण्यात आले आहे.

०२०-२५५०६८००/१/२/३/४

०२०-२५५०१२६९

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button