breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई, ठाण्यात दोन दिवस जोरदार पावसाचे संकेत; पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवरही 18-19 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी

महाराष्ट्रामध्ये यंदा चांगला पाऊस बरसणार असल्याचा हवामान वेधशाळेने अंदाज वर्तवला होता. त्यानंतर आता राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच पुन्हा दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये यंदा चांगला पाऊस झाला आहे. राज्यात काही ठिकाणी मात्र अति मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थितीही निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे , पालघर, कोकण , रायगड,कोल्हापूर,सांगली यांसारख्या अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे.

दरम्यान हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्याही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा, सांगली सह पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीजवळील शहरांनादेखील 18 आणि 19 ऑगस्ट दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई शहरांत गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे त्यात आजही जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. मध्य, पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासून जोरदार सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे शहरामध्ये आज दिवसभर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई शहरांत आज सकाळी 11.39 च्या सुमारास भरतीची वेळ होती. यामध्ये अंदाजे 4.42 मीटरच्या लाटा उसळल्या आहेत.

दरम्यान पुण्यातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली मध्येही अनेक नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती असल्याने नागरिकांना इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम देखील करण्यासाठी एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button