breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत गणेश विसर्जनासाठी सर्वाधिक नोंदणी गिरगाव चौपाटीसाठी; मात्र भाविकांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव

यंदा महाराष्ट्रासह जगभरात गणेशोत्सव सेलिब्रेशनवर कोरोना व्हायरसचं संकट आहे. यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान गणेश चतुर्थीला आगमनासोबतच गणेश मूर्ती विसर्जनाची देखील विशेष सोय करत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यंदा विसर्जनासाठी पालिकेकडून ऑनलाईन नोंदणी करून घेतली जात आहे. त्यासाठी विशेष वेबसाईटही गणेशभक्तांसाठी देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई शहरात सर्वाधिक नोंदणी ही दक्षिण मुंबईमधील गिरगाव चौपाटीसाठी झाली आहे. मात्र यंदा पालिकेने भाविकांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव केला आहे. पालिकेकडूनच काही स्वयंसेवक आणि कर्मचारी मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी समुद्रामध्ये जातील. अशी अट देखील ठेवण्यात आली आहे.

दरम्यान मुंबईमध्ये यंदा समुद्रावर आणि तलावात विसर्जनासाठी जाण्यासोबतच पर्यायी कृत्रिम तलावांची उपलब्धता करून देण्यासाठी आवाहन आणि प्रयत्न केले जात आहे. कृत्रिम तलावांमध्येच नागरिकांनी गणेशमूर्तींचं विसर्जन केल्यास नागरिकांची चौपाट्यांवर गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.

shreeganeshvisarjan.com या पालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांना विसर्जनासाठी ऑनलाईन वेळ घेता येणार आहे. यंदा 22 ऑगस्ट दिवशी गणपतीचं आगमन होणार आहे तर 27 ऑगस्ट दिवशी गौरी- गणपतींचं विसर्जन होईल. 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन 1 सप्टेंबर दिवशी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button