breaking-newsक्रिडा

‘मुंबई इंडियन्स’चे जय – वीरू भारतीय संघात

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेत ३ सामने खेळण्यात येणार आहेत. यातील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्माकडे नेतृत्वाची धुरा आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून ३ यष्टीरक्षक एकत्र खेळवण्यात येत आहेत. पण या पेक्षा महत्वाची बाब म्हणजे या संघातून पांड्या बंधू प्रथमच एकत्र खेळत आहेत. मुंबई इंडियन्सने याचे औचित्य साधून एक झकास फोटो (gif) ट्विट आहे.

Embedded video

Mumbai Indians

@mipaltan

Yes, it’s true 💙

The Pandya brothers will play together for the first time in the blue 🇮🇳 @hardikpandya7 @krunalpandya24

43 people are talking about this

भारतीय टी २० संघात दोन भावांची जोडी एकत्र खेळण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी २००७ साली भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युसूफ पठाण आणि इरफान पठाण हे दोघे एकत्र खेळले होते. पण त्यानंतर यांच्याव्यतिरिक्त इतर कोणतीही भावांची जोडी टी २० संघात खेळलेली नव्हती. आज अखेर हार्दिक पंड्या आणि कृणाल पांड्या हे दोघे एकाच संघात खेळताना पाहायला मिळाले.

CricBeat@Cric_beat

Pair Of Brothers Featuring Together In Same Team In T20Is (Indians)

Irfan & Yusuf Pathan
Hardik & Krunal Pandya*

See CricBeat’s other Tweets

याबरोबरच एक अजब योगायोग देखील पाहायला मिळाला आहे. युसूफ पठाण आणि इरफान ही भावांची जोडी बडोद्याची होती. योगायोगाने हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हि जोडीदेखील बडोद्याचीच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button