breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी मतदार संघात विविध विकासकामांचा ‘अनलॉक’

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार लांडगे यांच्या ‘व्हीजन’मधील प्रकल्पांना मूर्तरुप

पिंपरी । प्रतिनिधी
कोरोना आणि लॉकडाउनमुळे विकासकामांना ‘खो’ बसला होता. मात्र, आता भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये विकासकामे आणि नवीन प्रकल्पांचा ‘अनलॉक’ झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हीजन’मधील प्रकल्पांना मूर्तरुप येवू लागले आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन गुरूवारी करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे, भीमाताई फुगे, ॲड. नितीन लांडगे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून भोसरी येथील मनपा आरक्षण क्रमांक ४३० (प्राथमिक शाळा) विकसित करणे. तसेच, प्रभाग क्रमांक ७ मधील करसंकल इमारतीच्या शेजारी मनपाच्या ताब्यातील जागेमध्ये बहुउद्देशीय हॉल बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाउ साठे यांच्या १०० व्‍्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा बहुउद्देशीय हॉल बांधण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button