breaking-newsक्रिडा

मितालीला टी-२० तून वगळल्याने नेटकऱ्यांचा संताप

भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना गमावला. १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ ३४ धावांत भारताचे शेवटचे ८ गडी बाद झाले. सलामीवीर स्मृती मंधाना आणि जमायमा रॉड्रिग्ज वगळता एकही खेळाडूला २ अंकी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरदेखील स्वस्तात बाद झाली. या सामन्यात अनुभवी मिताली राज हिला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पराभूत झालेल्या भारतीय संघाच्या कर्णधाराला नेटकऱ्यांनी याबाबत चांगलेच धारेवर धरले.

भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला असताना मिताली राज हिला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारताला दुर्दैवाने पराभूत होऊन परतावे लागले होते. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर पोवार यांची फेरनिवडी न करता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण तरीदेखील आजच्या सामन्यात भारतीय संघ मिताली राजशिवाय मैदानात उतरला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा हरमनप्रीत वर टीकेची झोड उठवली.

Kartik Dimri@kartik_dimri

SO MUCH HATE FOR HARMANPREET KAUR. Grrrr. 😩😫

See Kartik Dimri’s other Tweets

Harshal@Harshal63345663

@ImHarmanpreet Same mistake by not picking up @M_Raj03,not learnt from previous t20 game ….selfish player in Indian women’s cricket team

See Harshal’s other Tweets

Akki@CrickPotato1

Has anybody tweeted “this is why you need Mithali Raj” yet ?

See Akki’s other Tweets

Lalit Patel@Lalit_Patel1992

Love her or hate her, India needs Mithali Raj as an anchor.

See Lalit Patel’s other Tweets

milk&bread@iamanIndian4568

Who is @M_Raj03 in T20I for India??
Answers from world: Lowest strike rater of bat:
Not a clean hitter of bat
She takes time
But my answer is one who stops Indian collapses. Another Day another collapse First need Batters then hitters. @BCCIWomen

See milk&bread’s other Tweets


दरम्यान, १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नवोदित प्रिया पुनिया अवघ्या ४ धावांवर माघारी परतली. यानंतर मराठमोळ्या स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्जने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचत भारतीय संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. स्मृती मंधानाने ३४ चेंडूत ५८ धावांची खेळी करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताची मधली फळी कोलमडली. न्यूझीलंडच्या ली तहाहूने ३ बळी घेत भारतीय संघाच्या डावाला खिंडार पाडलं. तिला लेह कॅसप्रेकने २ बळी घेत चांगली साथ दिली. स्मृती आणि जेमायमा रॉड्रीग्जचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button