breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

फ्रान्सचा एअरस्ट्राईक; एकाच वेळी ५० दहशतवाद्यांचा खात्मा

पॅरिस – मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र वर्गात दाखवल्यामुळे एका विद्यार्थ्याने इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकाची गळा चिरुन हत्या केली. या घटनेनंतर फ्रान्समध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अशातच फ्रान्स सरकारच्या दाव्यानुसार, मध्य माली येथे सैन्याने केलेल्या एका कारवाईमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या जवळपास ५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रान्स सैन्याने माली देशात ही एअरस्ट्राईकची कारवाई केली. या कारवाईत 50 दहशतवादी ठार झाले असून 4 जणांना जिवंत पकडण्यात सैन्याला यश आले आहे.

फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकेतील बुर्कीना फोसो आणि निगेरच्या सीमाभागात हा हल्ला करण्यात आला. हल्लाच्या ठिकाणाहून अनेक स्फोटकं आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. फ्रान्स सरकारने सोमवारी या एअरस्ट्राईकची माहिती माध्यमांना दिली. महत्त्वाचे म्हणजे या एअरस्ट्राईकसाठी मिराज जेट आणि ड्रोनची मदत घेण्यात आली. तसेच फ्रान्स सैनिकांनी जवळपास 30 पेक्षा अधिक मोटारसायकलींची या हल्ल्यात नासधूस केली.

दरम्यान, मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र वर्गात दाखवल्यामुळे एका शिक्षाकाची हत्या झाल्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी देश कुठल्याही हिंसेचे समर्थन करणार नसून हिंसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वीणीचा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर फ्रान्सने ही करवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button