breaking-newsमहाराष्ट्र

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई:  मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कालही मुंबई आणि कोकणात पावसाने हजेरी लावली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात धडकला, मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र पुन्हा पावसानं दमदार एन्ट्री घेतल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

मान्सूनच्या पावसात खंड पडल्यानं राज्यभरात पेरणीही रखडली होती. जोरदार सुरुवात केलेला मान्सून दडून बसल्यानं राज्यातील शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला होता. मात्र येत्या काही दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तर उर्वरीत राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.

कालपासून कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. किनार पट्टीच्या भागामध्ये पावसाने एन्ट्री घेतली. तर तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी  पाहायला मिळतायत. राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण या भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण रत्नागिरीमध्येही पावसाचं प्रमाण अधिक आहे.

सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने कालपासून पुनरागमन केलं. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. तर पुढच्या 24 तासातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button