breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केरळमधील नागरिकांना कोरोना लस मोफत मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोची – केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. केरळमधील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा विजयन यांनी नुकतीच केली आहे. दरम्यान, केरळमध्ये काल दिवसभरात ५ हजार ९४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर ५ हजार २६८ जण कोरोनातून बरे झाले.

वाचा :मोठी बातमी! टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या सीईओला अटक

यापूर्वी भाजपाने बिहारमध्ये राज्यातील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देणार असल्याची घोषणा केली होती. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने निवडणुकीसाठीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता. यावेळी भाजपाने बिहारी जनतेला मोफत कोरोना लसीचे आश्वासन दिले होते. बिहारनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीदेखील तामिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली होती. यामध्ये आता केरळ राज्याचाही समावेश होणार आहे.

तामिळनाडूप्रमाणे आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनीही घोषणा केली होती की, राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे. तसेच तेलंगणाचे आरोग्यमंत्री इटेला राजेंद्र यांनी घोषणा केली होती की, राज्यातील गरीब नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल. त्याचबरोबर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विटद्वारे जाहीर केले होते, ‘देशात करोनावरील लस निर्मितीचे कार्य जोरात सुरू आहे. जेव्हा ही लस तयार होईल. तेव्हा मध्यप्रदेशमधील प्रत्येक नागरिकास ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button