breaking-newsक्रिडापुणे

क्रिडा प्रबोधिनी, पुणे इलेव्हन संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला

  • ऑलंपिक डे फाईव्ह-अ-साईड हॉकी अजिंक्‍यपद स्पर्धा 
पुणे  – ऋतुजा पिसाळने केलेल्या 9 गोलांच्या जोरावर क्रिडा प्रबोधिनी संघ आणि पुणे इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुणे तर्फे आयोजित पहिल्या ऑलंपिक डेफाईव्ह अ-साईड हॉकी अजिंक्‍यपद (पुरूष आणि महिला) स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व हॉकी पुणेचे अध्यक्ष मनीष आनंद, ऑलंपियन विक्रम पिल्ले, हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोर यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेतील महिला विभागामध्ये अ गटाच्या झालेल्या सामन्यात क्रिडा प्रबोधिनी संघाने खडकी एज्युकेशन सोसायटीचा 15-0 असा धुव्वा उडविला. यामध्ये ऋतुजा पिसाळ हिने 9 गोल नोंदविले. यासह वैष्णवी फाळके व अक्षता बेकाडे यांनी दोन तर, सुनती जाधव व अंकिता सपाटे यांनी एकेक गोल केले.
दुसऱ्या सामन्यात पुणे इलेव्हन संघाने प्रियदशर्नी एससी संघाचा 13-1 असा एकतर्फी पराभव केला. पुणे इलेव्हनकडून कविता विद्यार्थी, राधिका वाडकर व आफरीन शेख यांनी प्रत्येकी दोन गोल केले. दिक्क्‌षा पाटील आणि श्रध्दा डोईफोडे यांनी प्रत्येकी 3 गोल नोंदविले.
स्पर्धेचा सविस्तर निकालः 
महिला विभागः अ गटः क्रिडा प्रबोधिनीः 15 (ऋतुजा पिसाळ 1, 3, 6, 7, 17, 21, 22, 27, 29 मि.; वैष्णवी फाळके 4, 5 मि.; अक्षता बेकाडे 9, 12 मि.; सुनती जाधव 23 मि., अंकिता सपाटे 26 मि.) वि.वि. खडकी एज्युकेशन सोसायटीः 0;
2) गट बः पुणे इलेव्हनः 13 (कविता विद्यार्थी 5, 27 मि.; राधिका वाडकर 13, 22 मि.; दिक्क्‌षा पाटील 14, 17, 18, 23 मि.; श्रध्दा डोईफोडे 15, 16, 28 मि.; आफरीन शेख 19, 26 मि.) वि.वि. प्रियदशर्नी एससीः 1 (शिवानी बावडेकर 26 मि.);
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button