breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईसह कोकणात थंडीत पावसाची हजेरी

मुंबई – राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पारा घसरायला सुरुवात झाली होती. यामुळे नागरिकांना थंडीची चाहूल लागली होती. मात्र आज अचानक पाऊस कोसळल्याने अनेकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. आज सकाळी सहा वाजल्यापासून मुंबईत पावसाने हजेरी लावली. सकाळी मुंबईच्या दादर, माटुंगा, माहिम अशा अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तसेच मुंबईसह कोकणातल्याही काही भागांत आज सकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळी साडे-पाच सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या पाहायला मिळाल्या.

वाचा :-भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 97,96,770 वर

आज मुंबईतील वातावरण ढगाळ आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते आणखी पश्चिम दिशेने सरकणार आहे. त्यामुळे आपल्याकडचे वातावरण ढगाळ स्वरुपाचे आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हे ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे क्षेत्र आहे तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिनांक 11, 12 आणि 13 डिसेंबरदरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button