breaking-newsक्रिडा

मुंबईला राजस्थानविरुद्ध आज परतफेडीची संधी

मुंबई – आयपीएलच्या अकराव्या हंगामातील उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरल्यास मुंबई अथवा राजस्थानचे या स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. त्या दृष्टीने उभय संघांमध्ये आज होणारा सामना अत्यंत महत्वाचा मानला जात असून या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो संघ प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल.
या मोसमाच्या सुरुवातीला गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांची कामगिरी अतिशय खराब झाली होती. मात्र मुंबई इंडियन्सने गेल्या तीन सामन्यांमध्ये सलग विजय मिळवताना प्ले-ऑफ फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. राजस्थाननेही आपल्या अखेरच्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत प्ले-ऑफ फेरीसाठी आपल्या आशा कायम राखल्या आहेत. त्यामुळे आजची ही लढत चुरशीची होणार हे निश्‍चित.

आयपीएलच्या चालू हंगामात मुंबईने आता पर्यंत आपल्या अकरा सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला असून सहा सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर राजस्थानने देखील आपल्या अकरा पैकी पाच सामन्यात विजय मिळवला असून त्यांचाही सहा सामन्यांत पराभव झाला आहे. चालू मोसमात दोघांदरम्यान हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात राजस्थानने मुंबईचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची मुंबईला उद्या संधी मिळेल.

मात्र, मुंबईने सलग तीन सामने जिंकून स्पर्धेत यशस्वी पुनरागमन केले आहे. या तिन्ही सामन्यांत मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी समयोचित कामगिरीची नोंद करत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे. राजस्थानने आपल्या अखेरच्या सामन्यात वेगवान सुरुवात करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या चेन्नई संघाला केवळ 176 धावांत रोखण्यात यश मिळवले होते, तर त्यांच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत सामन्यात विजय प्राप्त केला होता. मात्र दोन्ही संघांना आपले आव्हान जिवंत ठेवायचे असल्यास आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.


प्रतिस्पर्धी संघ – 
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कायरॉन पोलार्ड, मुस्तफिझुर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ईशान किशन, राहुल चाहर, एविन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जीन पॉल ड्युमिनी, ताजिंदर सिंग, शरद लुंबा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयंक मार्कंडे, अकिला धनंजय, अनुकूल रॉय, मोहसीन खान, एम. डी. निधीश व मिचेल मॅकक्‍लॅनेघन.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजू सॅमसन, बेन स्टोक्‍स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डीआर्की शॉर्ट, दुश्‍मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस. मिथुन, जयदेव उनाडकत, बेन लाफलिन, प्रशांत चोप्रा, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, जतिन सक्‍सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्‍रिच क्‍लासेन, झहीर खान आणि राहुल त्रिपाठी.
सामन्याचे ठिकाण- मुंबई, सामन्याची वेळ- रात्री 8 पासून. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button