breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आतातरी मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त आमदारकी द्या: काँग्रेस नेते मनोज कांबळे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

 संयुक्त महाराष्ट्र होऊन आज साठ वर्षे पूर्ण झाली. या साठ वर्षात महाराष्ट्राने सामाजिक, राजकीय अनेक चढ-उतार पाहिले विकासाच्या नवनवीन शिखरावरती महाराष्ट्राने उंच भराऱ्या घेतल्या.अनेक ऐतिहासिक घटना महाराष्ट्राने त्या साठ वर्षात पाहिल्या आहेत.

या सर्व घटनांमध्ये गाव कुसा बाहेरचा अनुसूचित जाती मधला मातंग समाज हा इमाने एतबारे देशाच्या स्वातंत्र्य काळापूर्वी पासून,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते आज रोजी पर्यंत देशाची,राज्याची सेवा करताना तसेच देशावर-राज्यावर संकट आले की आपल्या छातीचा कोट करुन त्या संकटाला सामोरा जाणारा हा मातंग समाज अशी इतिहास स्वतः साक्ष देतो.

परंतु हे सर्व असताना देखील मातंग समाजाची सामाजिक, आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय उपेक्षा आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे हे वास्तव आपणाला स्विकारावेच लागेल.महाराष्ट्र राज्यामध्ये अनु जातीच्या लोक संख्येमध्ये क्रमांक दोनवर मातंग समाजाची लोकसंख्या असुन हा समाज आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे . काँग्रेसचा सर्वधर्म _ समभाव _ त्यागाची व बलीदानाची परंपरा , व राष्ट्राची अखंडता आणि विविधतेमधील एकात्मता या वैचारिक अधिष्ठानाला शिरसावंध्य मानुन याच विचार सरणीचं समर्थन करीत हा समाज देशाच्या स्वातंत्र्यापासुन ते आज तागायत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला आहे.

महाराष्ट्रामध्ये *क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे* , *साहित्य रत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे* यांच्या विचारांने प्रेरित होऊन समाजाला परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये सामिल करुन या लढ्यात समाजकारणाला राजकारणाची जोड देत त्या समाजाला काँग्रेस पक्षाच्या विचार सरणीशी जोडण्याचा प्रयत्न या समाजातील कार्यकर्याकडून सतत केला जात आहे 2020 हे वर्ष *साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे* यांचे जन्म _ शताब्दी ” वर्ष असल्यामुळे आमच्या स्वाभिमानी समाजला आपल्या पक्षा मार्फत विधान परिषदेची संधी देऊन सार्थक करावे

येऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांनावरून मातंग समाजातील काही जुन्या-जाणत्या नेत्यांशी,मार्गदर्शकांची चर्चा केल्यानंतर एक गोष्ट निदर्शनास आली कि विधानपरिषद स्थापने पासून ते आज पर्यंत विधानपरिदषदेत मातंग समाजाचे प्रतिनिधित्व कोणत्याच पक्षाने दिलेले नाही. हि खूप खेदाची बाब आहे.ज्या समाजानी जातीपेक्षा मातीवर प्रेम केले त्या मातीसाठी पडेल त्या वेळेस आपले रक्त सांडले, मिळेल ते काम करून आपले जीवन जगले,आपल्या न्याय हक्कासाठी कधीही आपल्या मातीची आपल्याकडून विटंबना होईल असे कोणतेही कृत्य केले नाही पोटाला चिमटा घेऊन या मातीची सेवा या ठिकाणी मातंग समाजाने केली. आणि याचे बक्षीस म्हणून मातंग समाजाला महाराष्ट्राकडून,देशाकडून सर्व क्षेत्रात उपेक्षाच झाली.

आज महाविकास आघाडीकडून आम्हाला आशेचे किरण दिसत आहे.महाविकास आघाडी विषयी समाजात एक विश्वासाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
अनुसूचित जातीमधील सामाजिक न्यायाची पोकळी मोठ्या प्रमाणात तयार झालेली असताना हि पोकळी भरून काढण्याची उत्तम संधी महाविकास आघाडीला आलेली आहे. त्या पोकळीतला एक भाग म्हणजे साठ वर्षात विधानपरिषदेवर समाजाला न मिळालेले प्रतिनिधित्व. महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस या तिन्हीही पक्षांनी मातंग समाजाविषयी सकारात्मक विचार करून. विधानपरिषदेवरती मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाची इच्छा आहे. आणि आम्हाला यावर विश्वास आहे कि मातंग समाजाच्या विश्वासाला महाविकास आघाडी कुठेही तडा जाऊन देणार नाही.विधानपरिदषद स्थापने पासून मातंग समाजावर झालेला हा राजकीय अन्याय दूर करण्यासाठी येत्या निवडणुकांमध्ये विधानपरिषदेवरती मातंग समाजाला प्रतिनिधित्व देईल त्यात शंका वाटत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button