breaking-newsक्रिडा

चेन्नईसमोर आज हैदराबादचे कडवे आव्हान

पुणे – आयपीएलच्या अकराव्या हंगामात अव्वल कामगिरी करताना गुणतालिकेतही अव्वल दोन क्रमांकांवर असलेल्या सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात आज महत्त्वपूर्ण लढाई रंगणार आहे. दोन्ही संघांना गमावण्यासारके फारसे काही नसले, तरी हैदराबादला पराभूत करून गुणतालिकेत दुसरे स्थान निश्‍चित करण्याची चेन्नईला संधी आहे. चालू हंगामात आतापर्यंत हैदराबादने आपल्या अकरा सामन्यांपैकी नऊ सामन्यांत विजय संपादन केला आहे. त्यांना दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर चेन्नईने आतापर्यंत अकरापैकी सात सामने जिंकले असून चार सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या या मोसमात चेन्नई व हैदराबाद दरम्यान हा दुसरा सामना असून यापूर्वीच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला होता.

हंगामातील पहिल्या सामन्यापासूनच हैदराबादचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये समतोल कामगिरीची नोंद करत आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी संपूर्ण हंगामात प्रभावी मारा करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांना कायम दडपणाखाली ठेवण्यात यश मिळवले आहे. तर त्यांच्या फलंदाजांनी आपल्या कामगिरीद्वारे संघाला विजय मिळवून दिला आहे.
दुसरीकडे चेन्नईच्या संघाने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अनेक सामन्यांत विजय मिळवला असला, तरी बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाजीची बाजू तुलनेने कमकुवत असलचे दिसून आले आहे. काही वेळा चांगली सुरुवात मिळूनही त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उद्याचा सामना जिंकायचा असल्यास त्यांच्या फलंदाजांबरोबरच गोलंदाजीनी जबाबदारी उचलण्याची आवश्‍यकता आहे.


प्रतिस्पर्धी संघ – 
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ ड्यु प्लेसिस, हरभजन सिंग, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, दीपक चाहर, के.एम.आसिफ, कनिष्क सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शौर्य, मुरली विजय, सॅम बिलिंग, मार्क वूड, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्‍नोई, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर व एन. जगदीशन.

सनरायजर्स हैदराबाद– केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, वृद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बेसिल थंपी, टी. नटराजन, सचिन बेबी, विपुल शर्मा, मेहंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन.
सामन्याचे ठिकाण- पुणे, सामन्याची वेळ- दुपारी 4 पासून. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button