breaking-newsक्रिडा

बंगळुरुविरुद्धच्या पराभवानंतर दिल्ली आयपीएलमधून बाहेर

नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमातून बाहेर होणारी दिल्ली ही पहिली टीम ठरली आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये बंगळुरूने दिल्लीचा ५ विकेटने पराभव केला. बंगळुरूच्या या विजयाचे शिल्पकार ठरले एबी डिव्हिलियर्स आणि कर्णधार विराट कोहली.

दिल्लीने ठेवलेल्या १८२ रनचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सने ३७ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ४ फोरचा समावेश होता. तर विराट कोहलीने ४० बॉलमध्ये ७० रन केले. कोहलीने ३ सिक्स आणि ७ फोर लगावल्या. दिल्लीने ठेवलेले हे आव्हान बंगळुरुने १९ ओव्हरमध्ये पूर्ण केले. एकीकडे दिल्लीचे आयपीएलमधले आव्हान संपुष्टात आलेले असले तरी बंगळुरू मात्र अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. पण बंगळुरुचे प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणे हे इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.

या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने २० ओव्हरमध्ये १८१ रन केल्या. ऋषभ पंतनं ३४ बॉलमध्ये ६१ तर अभिषेक शर्मानं १९ बॉलमध्ये ४६ रन केले. बंगळुरुच्या युझवेंद्र चहलनं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर मोईन अली आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button