TOP Newsताज्या घडामोडीपुणे

भूकरमापक पदाची परीक्षा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात

पुणे : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सव्‍‌र्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे. त्यासाठी २८ किंवा २९ नोव्हेंबर ही तारीख अंतिम करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाने भूकरमापक-लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये सुरू केली. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. १०२० पदांसाठी राज्यभरातून तब्बल ७६ हजार ३७९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ४६ हजार अर्ज वैध ठरले असून या उमेदवारांना पदभरतीची प्रतीक्षा आहे.

पदभरतीसाठी पुणे विभागात १६३, कोकण प्रदेश-मुंबई २४४, नाशिक १०२, औरंगाबाद २०७, अमरावती १०८ आणि नागपूर विभागात १८९ जागा भरण्यात येणार आहेत.  दरम्यान, गेल्या महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत भूमी अभिलेख विभागाची परीक्षा ‘आयबीपीएस’कडून घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार ही परीक्षा चालू महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात २८ किंवा २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी ज्या खासगी संस्थेकडे परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्या संस्थेकडून १५ नोव्हेंबरनंतर परीक्षार्थीना ई-मेल किंवा भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षा केंद्र आणि पावती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जमाबंदी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

तातडीने नियुक्तिपत्र देण्याची व्यवस्था..

भूमी अभिलेख विभागाच्या विविध विभागांतील रिक्त असलेल्या जागांवर परीक्षा झाल्यानंतर भूकरमापकांची तातडीने भरती होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन परीक्षा पार पडल्यानंतरच्या १५ दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात प्रत्यक्षात नियुक्तिपत्र देण्यात येणार असल्याचेही भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button