breaking-newsपुणे

“क्वार्टर पीन’ निसटल्याने पीएमपीचा अपघात

पुणे – कात्रजहून निगडीकडे निघालेल्या पीएमपीच्या बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन काही प्रवासी जखमी झाले होते. या घटनेचा अहवाल पीएमपीच्या अपघात विभागाने तयार केला असून यामध्ये हॅन्डल रॉडला सपोर्ट देण्यासाठी खालच्या बाजूला असलेली “क्वार्टर पीन’ निसटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सोमवारी पीएमपीचा अपघात झाला. यामध्ये काही प्रवासी जखमी झाले होते. पीएमपीच्या ताफ्यातील ही बस खासगी ठेकेदाराकडून चालवली जात होती. दरम्यान, पीएमपीच्या अपघात विभागाने प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्यावरुन जाताना चालकाला छोटासा खड्डा लागला. यावेळी बसचा वेग जोरदार असल्याने बसच्या पुढील भागाला जोरदार झटका बसला. यामुळे स्टेअरिंग रॉडला खालील भागात सर्पोर्ट करण्यासाठी असलेली “क्वार्टर पीन’ निसटल्याने स्टेअरिंग रॉडचा ताबा सुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात कोसळली. यामुळे अपघात झाला असल्याचे प्रथमदर्शनी अहवालात समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button