breaking-newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजन

सोनूने आपला शब्द पाळला; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ‘Warrior Aaji’ सोबत सुरु करणार ट्रेनिंग सेंटर

कोरोना व्हायरस संसर्ग व त्यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे अनेकांना आर्थिकदृष्ट्या संकटाला सामोरं जाव लागलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना इतर विविध उद्योग करण्यास भाग पाडले गेले. अशात लॉक डाऊन दरम्यान, पुण्यातील रस्त्यावर लाठीच्या सहाय्याने आपले करतब दाखवणाऱ्या 85 वर्षाच्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. रस्त्यावर काठीच्या सहाय्याने आपले कसब दाखवणाऱ्या या शांताबाई पवार आजी, एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक भाग होत्या. हा व्हिडिओ समोर आल्यावर त्यांना अनेकांनी मदत केली. इतकच नाही तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आजीला मदतीचा हात पुढे केला होता. त्यात सोनू सूदनेही त्यांना मदतीचा हात दिला होता. सोनूने आपला शब्द पाळला असून आता लवकरच आजीचे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार आहे.

लॉक डाऊनमध्ये चार पैसे कमावण्यासाठी शांताबाई पुण्यातील रस्त्यावर आपले लाठीचे कसब दाखवत होत्या. हा व्हिडिओ पाहून शांताबाई या देशातील महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देऊ शकतात, असा सोनू सूदचा विश्वास होता, म्हणून शांताबाई यांच्याबरोबर संयुक्तपणे प्रशिक्षण सेंटर उघडण्याचे त्याने आश्वासन दिले होते. आता गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर हे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार आहे.

24 जुलै रोजी सोनू सूदने ट्वीट करत विचारणा केली होती की. ‘कृपया या आजींचा तपशील मिळू शकेल का? या आजींच्या सोबत मला एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे, जिथे त्या आपल्या देशातील महिलांना काही आत्म-संरक्षणाचे धडे देऊ शकतील.’ ‘निर्मिती’ संस्थेने ट्विटरवर शांताबाई पवार यांच्यासह फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. ट्वीटमध्ये त्यांनी सांगतिलं आहे की, ‘आज निर्मिती परिवारातील सदस्यांनी #Warrior_aaji यांची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचे स्वप्न ‘निर्मिती फाऊंडेशन’ येणाऱ्या 22 ऑगस्टला सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे.’

दरम्यान, शांताबाई पवार यांनी वयाच्या आठव्या वर्षी लाठ्याकाठ्यांचा खेळ ,ढालपट्टा खेळण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रितेश देशमुखनेही आजींशी संपर्क साधला होता. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेत एक लाखांचा धनादेश आणि नऊवारी साडी देऊन आजींचा सन्मान केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button