breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत कोरोनावरील औषधांचा काळाबाजार

कोरोनावरील रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅबच्या औषधांचा काळाबाजार होत असल्याचं वृत्त आल्यानंतर हा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. या विभागाने कोरोनाची औषधं मिळणाऱ्या अधिकृत मेडिकलची नावं त्यामुळे जाहीर केली आहेत

मुंबईत कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. या विभागाने कोरोनाची औषधं मिळणाऱ्या अधिकृत मेडिकलची नावं जाहीर केली आहे. त्यामुळे कोरोना औषधांचा काळाबाजार रोखला जाण्यास वक्कीच मदत होणार आहे.

मुंबईत कोरोनावरील रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब या दोन औषधांचा काळाबाजार होत असल्याचे वृत्त आले होते. रेमडेसिवीर हे औषध तयार करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने हेटेरो हेल्थ केअर, सिप्ला लिमिटेड आणि मायलान लॅब लिमिटेड यांना परवानगी देण्यात आल्याचं आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. कोरोनाचा काळाबाजार होत असल्याने नागरिकांनी घाटकोपरसह इतर ठिकाणच्या मेडिकल समोर या दोन औषधांसाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. त्याची दक्षता घेऊन कॅबिनेट मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी छापेही मारले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनानेही धडक कारवाईस सुरुवात केली होती. करोनावरील औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०च्या अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा औषध प्रशासन विभागाने दिला होता. त्यानंतर या विभागाने मुंबईतील कोरोनाचे औषधे विकणाऱ्या मेडिकलची अधिकृत यादी जाहीर केली आहे.

दरम्यान मुंबईत कोणत्या ठिकाणी ही औषध मिळणार आहेत त्या मिडिकलचे नाव आणि पत्ताही तसेच फोन नंबरही देण्यात आला आहे.

  • हेटेरो हेल्थकेअर लि. अंधेरी (पूर्व)
    ०२२-२६८४९३४०
    ०२२-२६८४९३३७/८/९
    ८५५३९१०४१४
    ९३७३१७४२०३
  • मानवी लाईफकेअर कांदिवली (पश्चिम)
    ९७६८२७५५२७
    ९८९२९७५४०४
  • दिव्या एंटरप्रायझेस
    ०२२-२४१५०३७४
    ०२२-२४१५०३८४
  • हॉस्पीटर केमिस्ट वरळी सी फेस
    ०२२-२४९२१८२१
    ८०८०९२१८२१
  • साई फार्मा घाटकोपर (पश्चिम)
    ०२२-२५१०८९८९
    ९८२०४३६१२३
  • रॉयल
    ९८२०३४४४५६
  • अर्थ सेल्स एजन्सी
    ९९८६१४१११३
  • नेक्सस
    ९६६४४००५७५

टॉसिलीझूमॅब इंजेक्शन मिळण्यासाठी मेडिकलचं नाव,फोन नंबर आणि पत्ता

  • रोचे प्रोडक्ट्स इंडिया प्रा.लि. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स वांद्रे (पूर्व)
    संपर्क नं. ०२२-३३९४१४१४
  • सीएससी फार्मास्युटीकल इंटरनॅशनल गामदेवी
    फोन: ९९६७६२१२३८, ९८२०३२१२३८, ८००३०१०३०९०
  • इनोक्युलेट लाईफ सायन्स वांद्रे (पश्चिम)
    फोन: ९८३७०२८२४९, ८००६८००६३३
  • व्हिएसबी लाईफ केअर सीवूड्स फोन : ९१५२१००९७५
  • भाऊ सुळे अर्कशाळा, डोंबिवली इंडस्ट्रीअल ऐरिया डोंबिवली पूर्व
    फोन: ९३२४७७३३४४, ९८२०२७८७३६
  • ट्रोनोकोमोडायझिन थेराप्युटिका, गामदेवी
    फोन: ८१६९१८८९०२, ७९७७६०६२८२
  • सनराईज प्रोसेस इक्विपमेंट, बोईसर
    फोन: ९१५२१९६८२४

.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button