breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
‘इतनी शक्ति हमें देना दाता..’ गाण्याचे प्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे निधन,
मुंबई: प्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे निधन झालेले आहे. ते 74 वर्षांचे होते. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुश’ चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या ‘इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना…’ या गाण्याने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिलेली होती. मुंबई येथील राहत्य घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रदीर्घ काळापासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते.