breaking-newsमुंबई

मुंबईत आठवड्याभरात 143 प्रतिबंधित क्षेत्रे बंधनमुक्त

पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱया उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात येत असून एकाच आठवडय़ात 143 क्षेत्रांची प्रतिबंधातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे मुंबईत आता 631 प्रतिबंधित क्षेत्र राहिली असून 6169 इमारती सील करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित रुग्ण जास्त आढळणाऱया भागात पालिकेच्या माध्यमातून संबंधित परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येतो. तर इमारतीत रुग्ण आढळल्यास इमारत किंवा इमारतीचा भाग सील करण्यात येत आहे. दरम्यान, रुग्णवाढ होणाऱया दहिसर, कांदिवली, बोरिवलीसारख्या भागात इमारतीत 3 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णयही नुकताच घेण्यात आला आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात अशी होतेय घट
– मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईत 3097 इमारती सील तर 696 बाधित क्षेत्र होती. परंतु 3 जूनपासून लॉकडाऊन टप्याटप्याने खुले करण्यास आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांच्या आकडेवारीत वाढ झाली. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात 798 प्रतिबंधित क्षेत्र, तर 4538 इमारती सील केल्या होत्या.

– तर 9 जुलै रोजी 751 कंटेनमेंट झोन तर 6597 सील इमारती होत्या. मात्र 18 जुलैमध्ये दोन्ही प्रतिबंधित क्षेत्रात घट होऊन हा आकडा प्रतिबंधित क्षेत्र 708 आणि सील इमारतींची संख्या 6235 पर्यंत खाली आली आल्याने एकूण 405 क्षेत्र प्रतिबंधातून कमी झाली. तर आता 25 जुलै रोजी या प्रतिबंधित क्षेत्रात 77 ने तर सील इमारतींची संख्या 66 ने कमी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button