breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भारताविरूद्धच्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा लाजिरवाणा विक्रम

भारताला विजयासाठी अवघ्या १०९ धावांचे आव्हान

रायपूर : भारतविरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाला अवघ्या १०८ धावांत गुंडाळले आहे. मोहम्मद शमीने न्यूझीलंड संघाचे ३ गडी बाद केले आहेत.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाचे ५ फळंदाज अवघ्या १५ धावांवर गारद झाले. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासात पहिल्यांदाच ५ खेळाडू इतक्या लवकर बाद झाले आहेत. त्यामुळे न्यूझीलंड संघासाठी हा सामना लाजिरवाणा ठरला आहे.

न्यूझीलंड संघाकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ५२ चेंडूत ५ चौकार लगावत ३६ धावा केल्या आहेत. त्यासोबतच मायकेल ब्रेसवेलने ३० चेंडूत ४ चौकार लगावत २२ धावा केल्या. तर मिचेल सँटनरने ३९ चेंडूत २७ धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने दुहेरी आरडा पार केलेला नाही. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ अवघ्या ३४.३ षटकांत १०८ धावा करू शकला आहे. भारताला १०९ धावांचे आव्हान असणार आहे.

या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने ६ ओव्हर मध्ये ३ बळी घेतले आहेत. तर हार्दिक पांड्या आणि वॉशिग्टन सुंदरनी प्रत्येकी २ बळी घेतले आहेत. मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदिपने प्रत्येकी १ बळी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button