breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या भाजप पदाधिकांनो जागे व्हा; वारक-यांना सोई-सुविधा द्या

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे महापाैर, आयुक्त श्रावण हर्डिकरांना पत्र

पिंपरी ( महा ई न्यूज ) – संत तुकाराम महाराज पालखीचे 24 जून आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे 23 जून रोजी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे दोन्ही पालखी मार्गावर वारकरी व भाविकभक्तांना कोणत्याही अडीअडचणी येवू नयेत. दोन्ही ही संताचा पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी महापालिका हद्दीतील संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी करावी, वारक-यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कारण, कुंभकर्णी झोपेतून सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना, आयुक्तांना आम्ही पुन्हा एकदा जागे करीत आहोत, अशी उपरोधिक मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. तसेच पालखी सोहळ्यातील वारक-यांना, दर्शनासाठी येणा-यां भाविकांची गैरसोय झाल्यास सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन जबाबदार राहिल, असाही इशारा दिला आहे. 

महापाैर राहूल जाधव व महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान दि. २४ जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान दिनांक २३ जून रोजी होत आहे. गेल्या ३० वर्षापासून   संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवड शहरातून जाते, यावर्षी २५ जूनला हा पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणारे आहे.  पालखीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीरात असतो. त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी  पालखी तळावर वारक-यांसाठी शौचालयची सुविधा अपुरी असल्याचे दिसून आले. दरवर्षी महापालिका पालखी मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने अगोदर नियोजन करीत असते. व सुयोग्य नियोजनामुळे येणा-या वारक-यांची कोणतीही गैरसोय होत नव्हती व पुढील वारीसाठी वारकरी सुखासमाधाने मार्गस्थ होत असते.

यावर्षी पालखी ज्या मार्गावरुन जाणार आहे, त्या मार्गावर विशेषतशहराचे प्रवेशव्दार  निगडी येथील भक्ती शक्ती चौकामध्ये उड्डाण पुलाचे तसेच केबल टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे या चौकामध्ये रस्ते अरुंद झाले असून तसेच पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, मोरवाडी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौका पासून ते दापोडी पर्यंत  मेट्रोचे काम चालू आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला बॅरीकेटस लावण्यात आल्यामुळे आधीच अरुंद रस्ता अजून अरुंद झाला आहे. पालखी सोहळ्यात लाखो वारकरी शेकडो दिंड्यांसह पालखी रथाच्या पुढे मागे चालत असतात. त्यात त्यांच्या साहित्यांचे ट्रक, टेम्पो, पोलिस बंदोबस्ताची वाहने, रुग्णवाहिका आदीचा समावेश असल्यामुळे अरुंद रस्त्यामुळे वारक-यांची व भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे या मार्गावरुन जाणा-या पालखी सोहळ्यातील वारक-यांना व पालखीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व जगदगुरु श्री, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड हद्दीतील संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी करुन वारक-यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कारण कुंभकर्णी झोपेतून सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना व प्रशासनास आम्ही पुन्हा एकदा जागे करीत आहोत. तसेच  पालखी सोहळ्यातील वारक-यांना किंवा पालखी दर्शनासाठी येणा-यां भाविकांना त्रास अथवा गैरसोय झाल्यास सत्ताधारी भाजप व प्रशासन जबाबदार राहिल. असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button