breaking-newsTOP NewsUncategorizedराजकारणराष्ट्रिय

राजस्थानमध्ये काहीही शक्य; भाजपा आणि काँग्रेसचं जुळलं

राजकरणातील डावपेच कधी काय खेळी करतील हे कोणालाच कळणार नाही. याचा प्रत्यय राजस्थानमध्ये आला. राजस्थानमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे भाजपा आणि काँग्रेस यांचं नवी राजकीय समीकरण जुळलंय. पहिल्यांदाचा हे समीकरण पहायलं मिळालं. एका उमेदवारासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले.

काय आहे सत्य

राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख निवडणूक ही कायम लक्षात राहील अशीच झाली आहे. डुंगरपूर जिल्हा परिषेदेत काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपाचा जिल्हा प्रमुख निवडून आला आहे. जिल्हा प्रमुख पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडूक लढलेल्या भाजपाच्या सूर्या अहारी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने भारतीय ट्रायबल पार्टीचं (BTP) समर्थन असणाऱ्या पार्वती यांचा एका मताने पराभव करून विजेतेपद पटकावले.

वाचाः Crime: काय सांगता! फक्त सिगारेट उधार न दिल्याने पानटपरी चालकाची हत्या

जिल्हा परिषदेच्या २७ जागांपैकी १३ जागांवर बीटीपीचं समर्थन असणारे अपक्ष उमेदवार निवडून आले होते. तर दुसरीकडे काँग्रेसला सहा आणि भाजपाला आठ जागांवर विजय मिळाला होता. जिल्हा परिषदेत बीटीपीचं समर्थन असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने त्यांचा उमेदवार जिल्हा प्रमुख होणार हे पक्क होतं. याचवेळी बीटीपीला रोखण्यासाठी पहिल्यांदा भाजपा आणि काँग्रेसने हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच जिल्हा प्रमुख निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिला नाही.

दुसरीकडे भाजपाने आपली उमेदवार सूर्या अहारी यांना अपक्ष म्हणून उभे केलं तर दुसरीकडे बीटीपीचं समर्थन असणाऱ्या पार्वती यांनी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या मतमोजणीत सूर्या अहारी यांना भाजपाची आठ आणि काँग्रेसची सहा अशी एकूण १४ मतं मिळाली. तर पार्वती यांनी एकूण १३ मतं मिळाली. फक्त एका मताच्या फरकाने सूर्या अहारी यांचा विजय झाला.

वाचाः धक्कादायक! आई आणि तीन मुलांचे मृतदेह एकाच झाडाला…

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button