breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील 7 तलावात 94 टक्के पाणीसाठा जमा; 10 टक्के पाणीकपातही मागे घेतली जाणार

मुंंबईमध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासुन तुफान पाऊस सुरु आहे. सुदैवाने यावेळेस केवळ शहरातच नव्हे तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस झाला आहे. यानुसार रविवार, 23 ऑगस्ट पर्यंत सात ही तलावात 94 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. अतिरिक्त नगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 95 टक्केंची सरासरी गाठल्यावर मुंबईत सध्या सुरू असलेली 10 टक्के पाणीकपातही मागे घेतली जाणार आहे. मुंबईमध्ये यंदा धरणक्षेत्रात जुलै अखेरीपर्यंत पुरेसा पाऊस बरसत नसल्याने 5 ऑगस्ट पासून 20% पाणीकपात लागू केली होती. परंतू काल पर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या साठ्यात वाढ झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुंबईला तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि वैतरणा ही तलावं पाणीपुरवठा करतात. यापुर्वी जुलै मध्ये विहार, तुलसी तलाव पुर्ण पणे भरला होता. तर दुसरीकडे, मोडकसागर तलाव परिसरात असलेले वैतरणा धरण पूर्ण भरले आहे. त्या लवकरच तानसा धरणही भरेल असा अंदाज आहे. उर्वरित ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाचे अंदाज आहेत त्यामुळे ही धरणे लवकर भरुन पाण्याची चिंता कमी होऊ शकते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव व धरणात एकूण साठवण क्षमता 14.47 लाख लिटर इतकी आहे. हे तलाव ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत तर त्यांचे पाटबंधारे विभाग नाशिक, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button