breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मोदींच्या फोटोमुळे दोन रेल्वे कर्मचा-यांच्या नोकरीवर गदा

बारांबाकी – भाजप सरकारने प्रचारासाठी सर्व फंड्यांचा वापर केला. परंतु, या फंड्यात नाहक दोन रेल्वे कर्मचा-यांना निलंबनाला सामोरे जावे लागले. मोदींचा फोटो छापलेले तिकीट प्रवाशांना दिल्याने दोन रेल्वे कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील बारांबाकी रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

बारांबाकी रेल्वे स्थानकामधील दोन कर्मचा-यांनी प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले तिकीट दिले होते. मात्र, सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने सरकारी व्यासपीठावरून अशा प्रकारे जाहीरताबाजी करणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. या प्रकरणी तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, या रेल्वे स्थानकात सुरुवातीला मोदींचा फोटो नसलेल्या कागदाच्या रोलवर छापलेली तिकीटे प्रवाशांना दिली गेली होती. मात्र, या कर्मचा-यांची शिफ्ट संपल्यानंतर त्याजागी दुसरे कर्मचारी आले आणि या कर्मचा-यांनी चुकून मोदींचा फोटो असलेला रोल मशीनला लावला आणि त्यावर तिकीटे छापली आणि ती प्रवाशांना देण्यात आली, यामुळे दोन कर्मचा-यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button