breaking-newsमुंबई

मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी ९३ दिवसांवर पोहोचला

मुंबई – मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सरासरी ९३ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईतील १,८५४ जणांना काल बुधवारी संसर्ग झाल्याचे चाचणीअंती स्पष्ट झाले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संकेतस्थळावर तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारी मुंबईतील रुग्णांची पूर्ण संख्या उपलब्ध होऊ शकली नव्हती. मात्र आयसीएमआरच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून मंगळवारच्या उर्वरित रुग्णांची संख्या बुधवारच्या रुग्णसंख्येसोबत जाहीर करण्यात आली. त्यामुळे बुधवारची रुग्णसंख्या १ हजार ८५४ वर पोहोचली. मुंबईतील बाधितांची संख्या १ लाख ३९ हजार ५३२ वर पोहोचली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांतील ७७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता १ लाख १२ हजार ७४३ वर पोहोचली आहे. तसेच बुधवारी विविध रुग्णालयात दाखल २८ रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत ७ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १८ हजार ९७७ रुग्ण उपचाराधीन आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button