breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची ‘कर्तव्य परायणता’

– भोसरी-चऱ्होली मंडलातील पूर्वनियोजित कार्यक्रमाला उपस्थिती

– ‘राजीनामा’ घडामोडींनंतरही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिला, अशी चर्चा होती. मात्र, पक्षाच्या भोसरी-चऱ्होली मंडलांतर्गत पूर्वनियोजित कार्यक्रमाला गुरूवारी सकाळी उपस्थिती दर्शवली आहे.  त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीमुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचता कामा नये, या विचाराने पक्षाप्रती लांडगे यांची ‘कर्तव्य परायणता’ जपली, असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पार्टी,  भोसरी-चऱ्होलीचे मंडलाचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी गुरुवारी काळभोरनगर येथे नवनियुक्त पदाधिकाऱी यांच्या निवडपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे,  महापौर उषा उर्फ माई ढोरे, सरचिटणीस अमोल थोरात, राजु दुर्गे, प्रदेश महिला मोर्चाच्या कोशाध्यक्षा शैलाताई मोळक, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी यावेळी उपस्थित होते.
पक्षांतर्गत गटबाजी आणि निर्णय प्रक्रियेत होणारे अवास्तव हस्तक्षेप या कंटाळून आमदार महेश लांडगे यांनी राजीनामा दिला असून, प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे, अशी चर्चा पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी रंगली होती. आमदार लांडगे यांचा मोबाईल फोनही बंद होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमाला आमदार लांडगे शहराध्यक्ष या नात्याने उपस्थित राहीले. हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, असे सांगण्यात येत आहे. मात्र, बुधवारी झालेल्या घडामोडींमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमदार लांडगे यांनी राजीनामा दिला असेल, तर प्रदेश नेतृत्वाने तो मंजूर केला नाही का?  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लांडगेंना सबुरीचा सल्ला दिला का? याउलट, शहर भाजपामध्ये गटबाजीतून झालेला उद्रेक ‘आधी पक्ष..मग मी’ या भूमिकेतून शांत झाला का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
**

पण, महेश लांडगेंच्या चेहऱ्यावर नाराजी का?
कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या नेहमी गराड्यात असणाऱ्या महेश लांडगे यांच्या चेहऱ्यावर गुरुवारी सकाळी नाराजी दिसत होती. अगदी मोजक्या लोकांसोबत आमदार लांडगे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी जाणवत होती. कार्यकर्ते- पदाधिकारी यांची खुशाली विचारणारे लांडगे कमालीचे शांत होते. त्यामुळे शहर भाजपामध्ये काही सर्वकाही अलबेल असेल, तर लांडगेंच्या चेहऱ्यावर नाराजी का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button