‘मी पुन्हा येईन’ म्हणालो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई – मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा…अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधा-यांच्या टीकेला आज सभागृहात उत्तर दिले.
ते म्हणाले की, ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी देवेंद्र यांनी म्हटल्या आणि सभागृहात बाके वाजवून सर्वांनी त्यांना दाद दिली. ‘लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे १२० टक्क्यांनी मेरिटमध्ये आले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या आघाडी सरकारच्या गणिताची आकडेमोड केली.
आपल्यावरील अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना फडणवीस यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं.