breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘माझ्या निरपराध मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना जिवंत जाळा’

मुंबई – ‘माझी मुलगी निरपराध होती, तिच्यासोबत असं कृत्य केलेल्या नराधमांना जिवंत जाळा’ अशी उद्विग्न भावना पीडित तरूणीच्या आईने व्यक्त केली. तसेच जर पोलिसांनी वेळेत योग्य पाऊल उचलले असते, तर आमची मुलगी आज आमच्यात असती असं वक्तव्य पीडित तरूणीच्या कुटुंबाने केलं. पीडितेची बहिण तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता, तो भाग आमच्या क्षेत्रात येत नाही असे सांगत सायबराबाद पोलिसांनी तिला शमशाबाद पोलीस स्टेशनमध्ये सांगण्यात आले.  

हैदराबादमध्ये गुरूवारी झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर ओढावलेला हा भयानक प्रसंग. यामुळे मुलींची सुरक्षा हा प्रश्न गंभीर बनला आहे. एका शेतकऱ्याला मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी अर्धजळालेल्या स्कार्फ आणि सोनेरी रंगाच्या माळेवरून पीडीतेची ओळख पटली. शिवाय आजूबाजूला मद्याच्या बाटल्या देखील मिळाल्या. 

चार आरोपी अटक 
सामुहिक बलात्काराप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. यात दोन वाहनचालक आणि एक क्लीनर होता. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी आरोपींची नावं आहेत. चार आरोपिंनी कट रचत हे निर्घृण कृत्य केलं आहे. नराधमांनी पीडित मुलीची मोटर सायकल पंक्चर केली होती. त्यानंतर तिचं अपहरन करून बलात्कार आणि हत्या करण्यात आली. रंगा रेड्डी जिल्ह्यातील चटनपल्ली उड्डाणपूलाखाली पीडित तरूणीला जाळण्यात आलं. पोलिसांनी पीडित तरूणीची मोटर सायकल, कपडे, चप्पल घटनास्थळावरून हस्तगत कले.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button