breaking-newsताज्या घडामोडीपुणे
‘मिसेस उपमुख्यमंत्री’ यांची खेड-शिवापूर येथील पीर हजरत कमर अली दुर्वेश बाबा दर्गाला भेट
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांनी रविवारी खेड-शिवापूर येथील पीर हजरत कमर अली दुर्वेश बाबा दर्गाला भेट दिली. तसेच, यावेळी त्यांनी प्रथेनुसार प्रार्थनाही केली.
खेड शिवापूर येथील शिवाजीभाई ढमढेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पुणे अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, सुशांत ढमढेरे, बाळासाहेब कोंडे, भागवान कोंडे यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.