breaking-newsपिंपरी / चिंचवड

मिळकत करवाढ मागे घ्या, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती पिंपरी-चिंचवड शहर कमिटीच्या वतीने पालीका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन मिळतीवर भरमसाठ करवाढ केली आहे, ती मागे घेण्याची मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी असुन सर्वसामान्य नागरिक व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रहात आहे. बी. एस. 6 गाडी, बाजारात येण्यासाठी केंद्र सरकारने बरेच निर्बंध घातले आहेत. त्यामुळे औद्योगिक आस्थापनामध्ये मंदी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे आस्थापनामध्ये उत्पादन व विक्री मंदगतीने चालू आहे. यामुळे कामगार व मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. पालीकेने सन 2007 पुर्वीच्या निवासी मिळकतीचा कर दुप्पटीपेक्षा जास्त वाढवला आहे. शहरात जवळपास तीन लाख नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यामध्ये राजकीय नेते, पक्ष मुग गिळून बसल्याचे चित्र दिसत आहे. यांना सर्व सामान्य नागरीकांचे काहीही देणे घेणे नाही, असे चित्र दिसत आहे.

पालीकेला विकासकामे करावयाची आहेत, व झाली ही पाहिजेत असे आमचे ही मत आहे. पण नागरीकांचा आर्थिक बळी देऊन विकास कामे काय कामाचे ? प्रथम हजारो कोटी थकबाकी धनधांडग्या लोकांकडून वसूल करावी. आपण करवाढ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. असे शहराध्यक्ष अन्ना जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पालीकेने उत्पन्न वाढीसाठी शास्तीकर जे नागरिक भरत नसतील पण त्यांना मुळ कर भरण्याची ईच्छा आहे, अशा नागरिकांसाठी कर भरण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणालीत बदल करून द्यावा,  म्हणजे नागरिक मुळ कर भरतील व पालीकेचे उत्पन्न ही वाढेल. प्रमाणीक मिळकत कर भरत आहेत त्यांना दिलासा द्यावा असे जोगदंड यांनी निवेदनात म्हटले आहे.

संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, सचिव अँड सचिन काळे, सहसचिव गजानन धाराशिवकर ,पंडीत वनसकर युवक अध्यक्ष अतिश गायकवाड यांच्या निवेदनावर सहया केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button