breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

५ कॅमेऱ्याचा OnePlus 8T येतोय, लाँचआधीच फीचर्स लीक

नवी दिल्ली – चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी वनप्लस आपल्या नवीन डिव्हाईस OnePlus 8T वर काम करीत आहे. फोन सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केले जावू शकते. एका ताज्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, नवीन फोन OnePlus 8 पेक्षा वेगळा कॅमेरा मॉड्यूल दिले जावू शकते. PriceBaba ने OnLeaks सोबत मिळून फोनची काही रेंडर फोटो शेयर केली आहेत. यावरून हे उघड झाले आहे की, OnePlus 8T मध्ये रॅक्टँग्यूलर कॅमेरा मॉड्यूल देण्यात येणार आहे.

120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, वनप्लस ८ टी मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. याआधी कंपनीने वनप्लस ८ प्रो मध्ये रिफ्रेश रेटचा डिस्प्ले दिलेला आहे. तसेच याशिवाय, स्मार्टफोन दोन व्हेरियंट 8GB+128GB आणि 12GB+256GB येवू शकतो. तसेच यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर मिळू शकतो.

कसा असेल कॅमेरा आणि बॅटरी
वनप्लस ८ टी मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असणार आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग मिळू शकतो. आतापर्यंत कंपनी 30W वार्प चार्ज चे फीचर देत होती. फोनची किंमत ४० ते ४५ हजार रुपयांदरम्यान असू शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button