breaking-newsपिंपरी / चिंचवड

मिळकतधारकांना ‘सोलर वॉटर हिटर’ आणि ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मिळकतदारांना सोलर वॉटर हिटर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग वापरणे अनिवार्य करा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

यासंदर्भात बाबर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची लोकसंख्या जवळपास 25 लाखांपर्यंत जाऊन पोचलेली आहे, पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील तसेच  महाराष्ट्र बाहेरील नागरिक उदरनिर्वाहासाठी शहरात आलेले आहेत. यामुळे शहराचा विस्तार वाढलेला आहे. त्याचबरोबर लोकसंख्याही वाढत आहे. वास्तविक पाहता औद्योगिकरणामुळे शहराचे, जिल्ह्याचे प्रदूषण वाढत आहे. 

गेल्या दोन दशकांमध्ये शहराचा विकास झपाट्याने होत असला तरी वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात  सिमेंट कॉंक्रीटच्या घरांची तसेच इमारतींची संख्याही वाढत आहे. यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. एकेकाळी पुणे, पिंपरी-चिंचवड हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. आज जर आपण पाहिले तर पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये  सायकलींवर प्रवास करणारे क्वचितच दिसतात. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकरणामुळे वाहनांची संख्या अतिशय वाढली आहे. वाढत्या या वाहनांमुळे प्रदूषणात ही भर पडत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे रोगराई, नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण, नैसर्गिक समतोल संपूर्णपणे ढासळत आहे.

नागरिकांनी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून पर्यावरणाचा     ऱ्हास  रोखण्यास व समतोल होण्यास मदत होईल याचाच एक उपाय म्हणून आपण सोलर वॉटर हीटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दोन उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना अनिवार्य करावे (स्लम क्षेत्र वगळून) जेनेकरून सोलर वॉटर हीटर वापरल्यामुळे ऊर्जेची बचत होईल. ऊर्जा ही राष्ट्रीय संपत्ती आहे. यामुळे राष्ट्रीय संपत्तीची बचत होईल. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढेल व जमिनीची धूप होणेे थांबेल व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना पुणे महानगरपालिके प्रमाणे पाच ते दहा टक्के सवलत देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांनाही हा उपक्रम करण्यात प्रोत्साहन मिळेल, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button