breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिळकतकर शास्तीसाठी जप्तीच्या नोटिसा तात्काळ थांबवा : माजी आमदार विलास लांडे

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मिळकतधारकांना शास्तीकर भरण्यासाठी जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात येत आहेत. आधीच कोरोनामुळे सामान्यांचे जीवन जगणे मुश्किल झालेले असताना महापालिका प्रशासनाकडून अशा पद्धतीने नोटिसा पाठवल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. शास्तीकर थकबाकीधारकांना जप्तीच्या नोटिसांचे वाटप तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समिती व पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत मागणीचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, “शास्तीकर थकबाकीबाबतचा निर्णय शासन स्तरावर फेरविचारासाठी प्रलंबित आहे. शासनाकडून निर्णय झालेला नसताना देखील महापालिकेकडून शहरातील शास्तीकरधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. या नोटिसा जप्तीच्या आहेत. महापालिकेची ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. नोटीस बजावलेल्या नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून नोटीस वाटपाचे काम थांबविण्यात यावे व वाटप केलेल्या नोटिसा परत घेण्यात याव्यात. असे न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात उपोषण तसेच तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.”

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे व पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button