breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सरकार मराठा आरक्षण देण्यास बांधिल – चंद्रकांत पाटील

पुणे –  राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यास बांधिल आहे. आरक्षणामुळे मराठा समाजाला ज्या सवलती मिळणार आहेत, त्या देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी मराठा संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

औंध आयटीआय येथे डॉ. पंजाबराव देशमुख मुलांच्या वसतिगृहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र राहाणे, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, राजेंद्र कोंढरे आदी या वेळी उपस्थित होते.   पालकमंत्री बापट यांनी या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी दहा लाखांचा निधी देण्यात येईल, असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button