breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मिर्ची कनेक्शन: राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ईडीसमोर हजर

मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा जवळचा साथीदार इक्बाल मिर्चीसोबतच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणी ईडीच्या रडारवर आलेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे चौकशीसाठी आज ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. पटेल यांनी ईडीने बुधवारी समन्स पाठवले होते. १८ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर व्हा, असे त्यांना सांगितले होते.

दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्या मालमत्तेचा विकास करण्यासाठी व्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावण्यात आले होते. १८ ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. ‘ईडी’ने कुख्यात मिर्चीच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली असून, याप्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी मिर्चीच्या दोन साथीदारांना ‘ईडी’ने अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून मिर्ची याची पत्नी हजरा आणि पटेल व त्यांची पत्नी वर्षा प्रवर्तक असलेल्या मिलेनिअम डेव्हलपर्स या कंपनीत झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आली. दाऊदचा अंमली पदार्थांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या व खंडणी उकळणाऱ्या मिर्चीने वरळीतील संबंधित मालमत्ता काळ्या व्यवहारांतूनच खरेदी केल्याचे ‘ईडी’च्या चौकशीत समोर आले आहे. यापैकीच वरळीतील एका मालमत्तेचा पुनर्विकास करून पटेल यांच्या कंपनीने सीजे हाऊस ही १५ मजली इमारत उभारली व तेथे मिर्चीच्या पत्नीला १६ हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा दिल्याचे हे प्रकरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button