breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सीईटी’ ‘जेईई’, ‘नीट’प्रमाणे होणार

एमएचटी सीईटी २०२१चा प्रश्नांची काठिण्यपातळी ‘जेईई मेन्स’ आणि ‘नीट’ परीक्षेप्रमाणे राहणार असे राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) जाहीर केले आहे. सीईटी सेलने इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या एमएचटी सीईटी २०२१चा सिलॅबस (MH CET) जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागाने कमी केलेल्या सीलॅबसवर यंदाची परीक्षा होणार आहे. सीईटी परीक्षेत २० टक्के प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर, तर बारावीच्या ८० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे.

सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षांचे सीलॅबस जाहीर करण्यात आले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या; तसेच ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. त्यानुसार हा २५ टक्के अभ्यासक्रम वगळून उर्वरित ७५ टक्के सीलॅबसवर परीक्षा होणार आहे.

वाचाः अण्णा हजारे दिल्लीत शेतकऱ्यांसाठी करणार शेवटचे उपोषण

परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही; तसेच संपूर्ण परीक्षा एमसीक्यू प्रश्नांवर परीक्षा होणार आहे. पीसीएम गटाची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्‌स, अशा विषयांवर, तर पीसीबी गटाची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अशा विषयांवर होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण सीलॅबस सीईटी सेलच्या www.mahacet.org वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

MBBS, MCA, BHMCT चाही सीलॅबस जाहीर

सीईटी सेलने एमएचटी सीईटीसोबतच एमबीए, एमसीए, एम-एचएमसीटी, बी-एचएमसीटी, एम-आर्च अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी परीक्षांचे सीलॅबस जाहीर केला आहे. त्याची माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button