breaking-newsपुणे

चालकाने थुंकण्यासाठी उघडलेला कारचा दरवाजा बेतला एकाच्या जीवावर

लासुर्णे : इंदापूर-बारामती मार्गावर चालकाने थुंकण्यासाठी अचानक कारचा दरवाजा उघडल्यामुळे दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला आहे.लासुर्णे (ता.इंदापुर) येथील बोरी चौकात शुक्रवारी(दि.१८) सकाळी ११ च्या सुमारास हाअपघात घडला. मल्हारी सुखदेव गायकवाड (वय ५५) असे या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कारचालक पसार झाला आहे.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कारचा दरवाजा उघडताना धक्का लागून गायकवाड खाली पडले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली गायकवाडयांचा जागीच मृत्यू झाला. इंदापूर- बारामती रस्त्यावर बारामतीच्या दिशेनेकार निघाली होती.यावेळी कार चालकाने अचानक आपल्या गाडीचा दरवाजा पाठीमागून पाहता उघडला. याचवेळी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील कर्दनवाडीचे गायकवाड (वय ५५) हे आपल्या दुचाकीवरून येत होते.  उघडलेल्या दरवाजाचाधक्का लागल्याने खाली पडले. दरम्यान, इंदापूर दिशेने निघालेली एसटी बस(क्रमांक  एमएच १२ / इएफ ६६७०) च्या मागील चाकाखाली गायकवाड सापडल्यानेगंभीर अपघात झाला.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गायकवाडयांच्या अपघातामुळे कर्दनवाडी व लासुर्णे परिसरात शोककळा पसरलीआहे.अपघातानंतर कारचालक पसार झाल्याने त्याची माहिती मिळाली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button