breaking-newsमनोरंजन

मिताली राज हिच्या बायोपीकमध्ये काम करणार तापसी पन्नू

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या बायोपिकमध्ये काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू इच्छूक आहे. मिताली राज हिच्या बायोपीकमध्ये काम करायला आपल्याला आवडेल. मात्र या संदर्भात आता काही बोलणे घाई होईल, असे तापसी म्हणाली.

“वायकॉम 18 मोशन पिक्‍चर्स’ने मिताली राज हिच्यावर आधारित बायोपिक बनविण्यासाठीचे अधिकार विकत घेतले आहेत. मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू आहे. दरम्यान या चित्रपटात निर्माते मिताली राजच्या भूमिकेसाठी तापसी पन्नू हिला घेण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तापसी या रोल मध्ये दिसेल का, यासाठी तिच्या चाहत्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तापसीसाठी सध्या आनंदाची बातमी ही आहे की ती आणि विकी अरोरा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या “नितीश्‍त्रा’ या शॉर्टफिल्मला “युट्युब’वर सर्वाधिक 17 लाख वेळा बघितले गेले आहे. या शॉर्टफिल्मसाठी तापसीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. “सूरमा’ रिलीज होण्यापूर्वीच या पुरस्कारासाठी तापसीच्या शॉर्टफिल्मची निवड झाली होती. आता तर त्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button