breaking-newsमनोरंजन

कपिल शर्माच्या बायोपिकसाठी ‘कृष्णा’चा नकार

दिगदर्शक विनोद तिवारी हे कपिल शर्माच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार आहेत.यासाठी त्यांनी कपिलचा रोल करण्यासंबधी कृष्णा अभिषेकला विचारणा केली होती. मात्र आता त्याने हा चित्रपट करणार नसल्याचे सांगितले आहे.
तसेच या चित्रपटासाठी कपिल देखील काही प्रतिक्रिया आणि रुची दाखवत नाही आहे. त्यामुळे हा चित्रपट होणार की, नाही यावर प्रश्न चिन्ह आहे.

मात्र दिगदर्शक तिवारी म्हणतात, कपिलने जरी यात होकार दिला नाही तरी कपिलच्या आयुष्यावर चित्रपट काढणारच.. बघू आता या चित्रपटाच काय होते ते. दरम्यान कपिल शर्मा या बायोपिकमध्ये स्वतःचा रोल स्वतःच साकारण्याची शक्‍यताही बोलून दाखवली जाते आहे. यानिमित्ताने कपिलला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. त्याने 2009 साली पहिल्यांदा एका पंजाबी सिनेमामध्ये काम करण्याचे निश्‍चित केले होते.

मात्र हा सिनेमा पडद्यावर कधीच रिलीज झाला नाही. त्यानंतर त्याने “फिरंगी’ नावाचा हिंदी सिनेमाही केला होता. त्याच्या सिनेमाला प्रेक्षकांची विशेष गर्दी झाली नाही, ही बाब लक्षात घेऊनच त्याने या बायोपिकमध्ये विशेष उत्साह दाखवलेला नाही, असे म्हणतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button