breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

स्वरा भास्कर म्हणाली – बाबरी मशीद स्वत:चं खाली पडली होती, ऋचा चड्ढाने ट्विटमध्ये लिहिले -वर आणखी एक न्यायालय आहे

मुंबई | 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी निकाल दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले.

न्यायालयाच्या या निर्णयावर काही बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा, जिशान अय्युब, गौहर खान, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी याप्रकरणार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ‘बाबरी मशीद स्वत:च खाली पडली होती,’ असे ट्विट केले आहे.

तसेच गौहर खान हिने “भूकंपामुळे मशीद पडली होती का?” असा सवाल केला आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले की, श्री लालकृष्ण आडवाणी यांचे अभिनंदन, आता तुम्ही या देशाच्या आत्म्यावर एक लांब रक्ताची रेष ओढल्याच्या आरोपांमधून मुक्त झाला आहात. देव तुम्हाला दीर्घायू देवो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button