breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ लोकसभेत शनिवारी दिग्गज नेत्यांच्या तोफा “धडाडणार”

  • पिंपरीत शरद पवार, फडणवीस यांची सभा
  • उध्दव ठाकरे यांची तोफ कर्जतमध्ये डागणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदार संघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वातावरण तयार करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहेत. तर, कर्जत येथे उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मावळ लोकसभा मतदार संघातील निगडीत मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी (दि. 3) फोडण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्राचाराचा नारळ फुटणार आहे. मुख्यमंत्र्यांची ही सभा म्हणजे भाजपचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. तर, या सभेला टस्सल देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व मावळ लोकसभा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार संजोग वाघेरे यांनी कामगार परिषदेचे निमित्त साधून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा याच दिवशी ठेवली आहे. रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे ही सभा होणार असून शहराचे तत्कालीन कारभारी अजित पवार हे देखील कामगारांच्या प्रश्नांवरून सत्ताधारी भाजपचा खरपूस समाचार घेणार आहेत.

तर, या दोन्ही सभा फेल ठराव्यात, यासाठी मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जतमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन दोन दिवस अधी म्हणजे गुरूवारी (दि. 1) केले आहे. बारणे यांना भाजपच्या उमेदवारापासून धोका असल्याने कोणत्याही परिस्थितीत मतदार संघात भाजपला फेव्हर असे वातावरण तयार होणार नाही, यासाठी त्यांनी प्रयत्न पनाला लावले आहेत. त्यासाठीच कर्जतमध्ये ठाकरे यांच्या करारी शब्दांत सत्ताधा-यांवर हल्ला चढविला जाणार आहे. लोकसभेच्या अनुषंगाने मावळ मतदार संघात तीन दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा पिंपरी-चिंचवड मध्ये तर उध्दव ठाकरे यांची सभा कर्जत येथे होणार आहे. तिन्ही पक्षांनी एकमेकांना टक्कर देण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यावर भर दिला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button